|Friday, March 22, 2019
You are here: Home » Top News » ऍट्रोसिटी विधेयक राज्यसभेत मंजूर;राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायदा होणार लागू

ऍट्रोसिटी विधेयक राज्यसभेत मंजूर;राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायदा होणार लागू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ऍट्रॉसिटी कायद्यात तत्काळ अटक व एफआयआर दाखल करण्याची तरतूद पुन्हा जोडण्यासंबंधीचे विधेयक लोकसभेपाठोपाठ गुरुवारी राज्यसभेतही मंजूर झाले आहे. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयक प्रत्यक्षात कायदा लागू होणार.

20 मार्चला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर कमकुवत झालेला एससी-एसटी अत्याचार निवारण कायदा (ऍट्रॉसिटी) आता पुन्हा मूळ रूपात बहाल होईल. ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत आरोपीला अटकपूर्व जामीन न देण्याचीही तरतूद आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी प्राथमिक चौकशीचीही गरज नाही. तोच नियम आता कायम राहील.

Related posts: