|Friday, March 22, 2019
You are here: Home » Top News »  औरंगाबादेद बंद कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड ; आंदोलकांची धरपकड सुरू

 औरंगाबादेद बंद कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड ; आंदोलकांची धरपकड सुरू 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

मराठा मोर्चाच्या बंददरम्यान काल पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतले आहे. औरंगाबादेत बंददरम्यान शेवटच्या टप्प्यात वाळूज एमआयडीसीत हिंसक वळण लागले.

आंदोलनातून झालेल्या हिंसेत वाळूज एमआयडीसीतील 60 कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर आणखी छोट्या 10 ते 12 कंपन्यांचेही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली आहे. आंदोलकांनी कंपन्यांमध्ये घुसून मोडतोडही केली. वोक्हार्ड कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. मायलॉन, स्टरलाईट या कंपन्यांवरही दगडफेक केली. आंदोलकांनी बंद कंपनीच्या गेटवर चढून आत प्रवेश केला. काही कंपनींच्या बंद गेटची चावी सिक्मयुरिटीकडून काढून घेतली. गेट उघडून कंपनीत प्रवेश केला आणि थेट तोडफोड केल्याचे, कंपनीच्या मालकांनी सांगितले. दरम्यान कालच्या आंदोलनाचा जवळपास 40 कंपन्यांना मोठा फटका बसला असून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे म्हटले जाते. गोंधळानंतर वाळुज औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्योजकांनी आम्ही आमचे उद्योग बंद करायचे का असा सवाल विचारला आहे. आंदोलनाच्या निषेधार्थ औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या आज बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत उद्योजकांनी सकाळी 11 वाजता बैठक आयोजित केली आहे.

Related posts: