|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » औरंगाबाद हिंसाचाराची सीआयडी चौकशी करा ; मराठा मोर्चाची मागणी

औरंगाबाद हिंसाचाराची सीआयडी चौकशी करा ; मराठा मोर्चाची मागणी 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

औरंगाबाद वाळूंज एमआयडीसीमध्ये झालेल्या तोडफोडीचा मराठा मोर्चाशी काहीही संबंध नाही. एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये झालेल्या तोडफोडीची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी औरंगाबाद मराठा मोर्चा समन्वयक विनोद पाटील यांनी केली. शुक्रवारी दुपारी मराठा मोर्चा समन्वय समितीने पत्रकार परिषद घेऊन वाळूंज एमआयडीसीमध्ये झालेल्या तोडफोडीचा आरोप फेटाळून लावला.

वाळूंज एमआयडीसीमध्ये झालेल्या तोडफोडीचा आम्ही निषेध करतो. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते वेगवेगळया चौकात आंदोलनाला बसले होते. दुसऱयाच कोणीतीरी ही तोडफोड केली आहे. त्यामुळे मराठा समाजाचे नाव खराब होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी समन्वय समितीने केली आहे.

 

Related posts: