|Saturday, March 23, 2019
You are here: Home » विविधा » पुणे विद्यापीठात औषधी वनस्पतीचे उद्यान विकसित होणार

पुणे विद्यापीठात औषधी वनस्पतीचे उद्यान विकसित होणार 

ऑनलाईन टीम / पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पाच एकर क्षेत्रावर वैशिष्टय़पूर्ण असे औषधी वनस्पतींचे उद्यान विकसित करण्यात येत आहे. महाराष्ट्रात आढळणाऱया एकूण सातशे औषधी वनस्पतींपैकी दोनशेहून अधिक प्रजातींची लागवड या उद्यानात करण्यात आली आहे. उद्यानातील झाडांची एकूण संख्या एक हजाराहून अधिक आहे. वेगाने नष्ट होत चाललेल्या वनसंपदेचे संवर्धन करणे हा या उद्यानाचा प्रमुख उद्देश आहे.

या उद्यानाला केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून यासाठी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उद्यानात पांढरा धूप, नागकेशर, सर्पगंधा, साल, काळाकुडा, सप्तरंगी, ब्राह्मी, उंडी अशा अनेक दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे. आयुर्वेदासहित इतर विविध उपचार पद्धतींत वापरल्या जाणाऱया वनस्पतींची लागवड या उद्यानामध्ये करण्यात आली आहे. याशिवाय, आदिवासी औषधी प्रकारांत वापरल्या जाणाऱया प्रजातींचाही समावेश या उद्यानामध्ये करण्यात आला आहे. संवर्धनासहित या वनौवनौषधींसंदर्भातील पुढील संशोधन करता येणेही या उद्यानाच्या माध्यमामधून शक्मय होणार असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक व वनस्पतीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट यांनी सांगितले. ‘महामना वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे औषधी वनस्पती उद्यान’ असे या उद्यानाचे नामकरण केले जाणार आहे. पुण्यातील प्रख्यात वैद्य खडीवाले यांनी विद्यापीठामध्ये अशा स्वरूपाचे उद्यान तयार करण्यासाठी सुमारे दोन दशकांपूर्वी निधी दिला होता. यांनतर 2013 मध्ये उद्यानासाठी जागा आरक्षित करण्यात आली होती.

Related posts: