|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » नोटेवर लिखाण केल्यास नेपाळमध्ये शिक्षा

नोटेवर लिखाण केल्यास नेपाळमध्ये शिक्षा 

काठमांडूः

नेपाळमधील चलनी नोटांवर कोणतेही लिखाण करणे, त्या फाडणे, जाळणे, किंवा त्यांवर एखादी रेष ओढणे असे प्रकार करण्यात आल्यास त्याबाबत संबंधितास शिक्षा करण्यात येणार असल्याची माहिती नेपाळ सरकारने दिली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी 18 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. 2007 च्या गुन्हेगारी कायद्यानुसार देशाचे चलन व नाणी यांचे नुकसान करण्यात आल्यास तीन महिन्यांचा तुंरुगवास आणि 5 हजार नेपाळी रुपयांचा दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात जनजगृती करण्यासाठी नेपाळ राष्ट्रीय बँक आणि सेन्ट्रल बँक यांनी आपल्या इतर बँकांच्या शाखांना व सर्वसामान्य नागरिकांना या नवीन नियमावली बाबत सूचना केल्या आहेत. या नियमाने चलनी नोटा आणि नाणी अधिक काळ टिकणार असून नवीन नोटांचा निर्मिती खर्च वाचणार आहे.