|Monday, November 12, 2018
You are here: Home » Top News » नासाची ऐतिहासिक ‘उड्डान’ 24 तासांनी लांबले

नासाची ऐतिहासिक ‘उड्डान’ 24 तासांनी लांबले 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :

चंद्र, मंगळावर स्वाऱया केल्यानंतर नासा ही संस्था आज दुपारी 1 वाजता अतिशय तप्त अशा सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी अंतराळ यान पाठविणार होती. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे अखेरच्या क्षणाला हा निर्णय बदलण्यात आला. आता हे यान उद्या, रविवारी दुपारी पाठविणार आहे. नासाने 24 तासांनी यानाचे उड्डान लांबणीवर टाकले.

सोलर पार्क प्रोब असे या यानाचे नाव असून ते सूर्यामध्ये होणाऱया गुढ स्फोटांचा, त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करणार आहे. रामायणकाळामध्ये मारुतीरायांनी लहान असताना फळासारखे लालबुंद दिसणाऱया सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतल्याचा उल्लेख आहे. हे यान एका कारच्या आकाराएवढे असून ते सूर्याच्या पृ÷भागापासून 40 लाख मैल दुरवरून त्याच्या कार्यकक्षेचा अभ्यास करणार आहे. महत्वाचे म्हणजे आजपर्यंत सूर्याची उष्णता आणि प्रखर प्रकाशाचा कोणत्याही यानाने सामना केलेला नाही. फ्लोरिडाच्या केप केनवेरल येथून आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 3 मिनिटांनी हे यान सूर्याकडे झेपावणार होते. परंतु, वेळ मोजणाऱया घडाळय़ामध्ये समस्या निर्माण झाल्याने नासाने यानाचे उड्डाण 24 तासांनी लांबणीवर टाकले. नासाच्या तंत्रज्ञांकडे 65 मिनिटांचा कालावधी होता. मात्र, बिघाड दुरुस्त न झाल्याने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला. या यानाला युनाटेड लाँच अलायन्सच्या डेल्टा 4 या रॉकेटद्वारे सोडण्यात येणार आहे. यानंतर पुढील काही महिन्यांतच हे यान सूर्याजवळ पोहोचेल. हे यान आतापर्यंतच्या माननिर्मित कोणत्याही यंत्रांपेक्षा सर्वात जवळ जाऊन निरीक्षण करणार आहे. सूर्याच्या प्रष्ठगावर कक्षेचे तापमान 300 पटींनी जास्त असते.

Related posts: