|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

सिंह राशीत प्रवेश करणारा सूर्य तुमच्या कार्यातील अडचणी दूर करण्यास मदत करेल. तुमचे वर्चस्व राजकीय, सामाजिक कार्यात वाढेल. चंद्र, मंगळ त्रिकोण योग होत आहे. मैत्रीमध्ये  मंगळवार, बुधवारी वाद होईल. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. जास्त उतावळेपणा व अहंकार ठेवू नका. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थी वर्गाने परीक्षेसाठी तयारी करावी, आळस करू नये.


वृषभ

 चंद्र, शुक्र युती,  सिंहेत सूर्य प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला जास्त महत्त्वाची कामे करून घ्या. धंदा मिळेल. आळस करू नये. राजकीय, सामाजिक कार्यात जबाबदारीने वागावे लागेल. सप्ताहाच्या शेवटी तुम्ही घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तगादा सुरू होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाने फालतू भानगडी करण्यापेक्षा अभ्यास करावा तरच यश मिळेल.


मिथुन

सिंहेत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढून तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ हीच आहे. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा अधिकार मिळेल. धंद्यात जम बसेल. शेअर्समध्ये मोठा फायदा होईल. दर्जेदार लोकांचा परिचय वाढल्याने कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. पैसे मिळतील. विद्यार्थी वर्गाने संधीचा फायदा घेऊन मोठे यश खेचावे. नोकरीत मनाप्रमाणे यश मिळेल.


कर्क

सिंहेत रवि प्रवेश, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. प्रत्येक दिवस तुम्ही यशस्वी व्हाल. प्रयत्न करा. नम्रता ठेवा, राजकीय, सामाजिक कार्यात लोकप्रियता मिळेल. तुमचे धोरण महत्त्वाचे कार्य करून जाईल. धंदा वाढेल. कायदा पाळा. थकबाकी वसूल करा. कला, क्रीडा क्षेत्रात थोरा मोठय़ांचा आशीर्वाद उपयोगी पडेल. घरातील वातावरण आनंदी राहील. मौजमजा प्रवास होईल.


सिंह

तुमच्याच राशीत प्रवेश करणारा रवि हा स्वगृहीचा असतो. तुमच्यावरील प्रति÷sचा असलेला दबाव कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात नेटाने प्रगती करता येईल. निश्चित विचार होईल. लोकसंग्रह वाढेल. धंद्यातील थोडी समस्या प्रेमानेच सोडवा. मार्ग मिळेल. जमीन, घर, दुकान इ. खरेदी विक्रीत फायदा होईल. कला,क्रीडा क्षेत्रात वर्चस्व वाढेल. विद्यार्थी उत्साही राहतील. घरातील वातावरण आनंदी राहील.


कन्या

सिंहेत रवि प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्याशी वाद घालणारे लोक सहवासात येऊ शकतात. धंदा मिळावा. थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात चर्चा सफल होईल. तुमच्या विचारांना दुजोरा देणारे लोक भेटतील. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. विद्यार्थी वर्गाने हुशारीचा उपयोग करावा. चांगली संगत ठेवावी. घरातील समस्या वृद्ध व्यक्तीची असू शकते.


तूळ

सिंहेत सूर्य प्रवेश, चंद्र, मंगळ त्रिकोण योग होत आहे. संसारात मंगळवार, बुधवारी तणाव, वाद होईल. वाहन जपून चालवा. भांडण कुठेही वाढवू नका. धंद्याकडे लक्ष द्या. नवीन काम मिळेल. राजकीय सामाजिक कार्यात तुम्हाला संधी मिळेल. वरि÷  तुमचे कौतुक करतील. नेटाने कार्य करा. जवळचे लोक हेवा, द्वेष करतील. रागात बोलू नका. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत निवडावी.


वृश्चिक

सिंहेत रवि प्रवेश, चंद्र, शुक्र युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. तुमची परीक्षा सर्वच ठिकाणी घेतली जाईल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. सप्ताहाच्या शेवटी किरकोळ मतभेद वाढू शकतात. स्वत:च्या ध्येयाचा, प्रकृतीचा विचार करून कृती करा. शेअर्सचा अंदाज बरोबर घेता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी वाढतील. यशासाठी  मुलांनी कष्ट घ्यावेत.


धनु

सिंहेत सूर्य प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी कमी होण्यास सुरुवात होईल. पूर्वीप्रमाणेच गैरसमज वरि÷ांच्यासमोर दूर करा. नोकरीतील तणाव, ताण कमी होऊ शकतो. धंद्यात तुम्हाला मिळतेजुळते धोरण ठेवावे लागेल. बोलणे घातक ठरणार नाही, याकडे लक्ष द्या. कला, क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घटना सप्ताहाच्या शेवटी घडेल. संसारातील समस्या कमी होण्यासाठी तिला मदत करतील.


मकर

रविचे राश्यांतर या आठवडय़ात होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान अपमान सहन करावा लागेल. कोर्टाच्या कामात मदत मिळू शकेल. नवीन परिचय होतील. संसारात चांगली बातमी मिळेल. नोकरी, व्यवसायात प्रगतीचा नवा टप्पा गाठू शकाल. कला, क्रीडा क्षेत्रात विजयश्री खेचून आणण्यात यश मिळेल. शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. प्रेमप्रकरणात यश संभवते.


कुंभ

सिंहेत रविचा प्रवेश होत आहे. संसारात महत्त्वाचे काम करतांना घरातील माणसांच्या बरोबर प्रथम चर्चा करा. वाद वाढवू नका. सोमवार, मंगळवारी राजकीय, सामाजिक कार्यात दगदग वाढेल. विरोधक तुमच्या कामातील त्रुटी दाखवतील. वाहन जपून चालवा. प्रेमाला चालना मिळेल. शिक्षक वर्गाला थोडा त्रास सहन करावा लागेल. धंद्यात नवीन कामे मिळतील. आठवडय़ाच्या शेवटी आर्थिक लाभ संभवतो.


मीन

धंद्यासंबंधी प्रश्न चिघळण्याची शक्मयता आहे. आप्ते÷ तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. कठोर बोलणे समस्या निर्माण करू शकते. प्रेमप्रकरणात थोडय़ा अडचणी येऊ शकतात. बुधवार गुरुवारी जीवन साथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. शिक्षण प्रवेशासाठी धावपळ करावी लागेल.