|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » विमानाची चोरी, काही अंतरावर दुर्घटनाग्रस्त

विमानाची चोरी, काही अंतरावर दुर्घटनाग्रस्त 

मेकॅनिकने चोरले विमान : दुर्घटनेत ठार

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेच्या सिएटल-टाकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एका कर्मचाऱयाने विमान चोरून त्यातून सुमारे तासभर उड्डाण भरले. परंतु दोन लढाऊ विमानांनी इशारा दिल्यावर त्याने विमान 50 किलोमीटर अंतरावरील केट्रॉन बेटावर कोसळविले.

कर्मचाऱयाने अलास्का एअरलाइन्सचे 76 आसनी विमान चोरले. कर्मचाऱयाने विमानाचे उड्डाण केल्यावर ते चोरीला गेल्याचे अधिकाऱयांना समजले. ही कोणतीही दहशतवादी घटना नाही, कर्मचाऱयाने केवळ मजेपोटी विमान उडविले होते, परंतु विमान नियंत्रित करण्यास तो अयशस्वी ठरला, असे पियर्स काउंटी शेरिफ यांनी सांगितले.

चोरी करणाऱया व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु त्याचे वय 29 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे.

नियंत्रण कक्षाशी संवाद

स्थानिक प्रसारमाध्यमांनी विमानतळ प्रशासन आणि कर्मचाऱयामधील संवादाची एक ध्वनिफित प्रसिद्ध केली आहे. यात कर्मचारी विमानातील इंधनाचे प्रमाण विचारत असल्याचे ऐकू येते. विमानाचे लँडिंग मी करू शकतो, कारण ते एक व्हिडिओगेम खेळण्यासारखे आहे. परंतु यशस्वी लँडिंग झाल्यास एअरलाइन्स मला नोकरी देणार का असा सवालही कर्मचाऱयाने केला होता. अधिकाऱयांनी विमान उतरविण्याचे आवाहन केले असता त्याने सैन्यतळावर लँडिंगचा प्रयत्न केल्यास सैनिक मला सोडणार नाहीत, असे सांगितले.

विचित्र स्थिती

विमानाच्या चोरीनंतर विमानतळावरील उड्डाणे रोखण्यात आली होती, परंतु आता स्थिती सुरळीत आहे. रात्री एक विमानाचा दोन लढाऊ विमाने पाठलाग करताना पाहिले. ते चित्र एका चित्रपटातील दृश्याप्रमाणे होते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Related posts: