|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नाटय़ कलाकृतीने रसिकजन खुष

नाटय़ कलाकृतीने रसिकजन खुष 

प्रतिनिधी/ राय

सांगोल्डा येथील श्री शांतादुर्गा सांगोडकरीण देवस्थान प्रांगणात चालू असलेल्या प. पू. श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वरी भारती यांच्या चातुर्मास व्रताचरण सोहळय़ानिमित्त काल शनिवारी 11 रोजी सायंकाळी 5.30 संगीत ‘शारदा’ या नाटकातील तसेच  ‘मरण कट्टो’ या कोकणी एकांकिकेतील निवडक प्रसंग अत्यंत उत्कृष्टरित्या सादर करुन नाटय़ कलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

गजानन  चोडणकर, गौरी चोडणकर, जान्हवी च्यातीम, सीताकांत बोरकर, दिपक च्यातीम, पिनाक चोडणकर या कलाकारांनी संगीत ‘शारदा’ या नाटकातील निवडक प्रवेश सादर करताना आपल्या अंगातील यावेळी सुप्त गुण प्रगट करुन प्रेक्षकांची मने जिंकली.

 वास्को येथील ‘अभियान आर्टस’ या संस्थेतर्फे ‘मरण कट्टो’ या कोकणी एकांकिकेतील काही निवडक प्रसंग यावेळी सादर करण्यात आले. राहुल चोडणकर, सुजय गोवेकर, मनोज हळदणकर, योगेश वेर्लेकर, प्रेमल शिरोडकर, प्रणिता बांदोडकर, निकीता साळकर या नाटय़ कलाकारांनी सादर केलेल्या कलाकृतीला उपस्थित प्रेक्षकांनी चांगली दाद दिली.

 तत्पुर्वी, सकाळी 11.30 वाजता स्वामीजींची सामुदायिक पाद्यपुजा होईल व दुपारी 1 वा. श्री ज्ञानेश्वरी देवीची महामंगलारती तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

आज नाटय़गीतांचा कार्यक्रम

आज 12 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुगम संगीत, अभंग व नाटय़गीत सादर करण्यात येणार आहे. कुडाळ येथील योगिता उल्हास रायकर शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करणार आहेत. हिन्दुस्तानी शास्त्राrय संगीतानंतर त्या सुगम संगीत, नंतर भजन व नाटय़गीते सादर करतील. त्यांना हार्मोनियमवर आनंद रायकर तर तबल्यावर प्रसन्न साळकर साथ करतील.