|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वाडे वास्कोतील तळय़ाच्या सौदर्यीकरणाचे काम जोरात

वाडे वास्कोतील तळय़ाच्या सौदर्यीकरणाचे काम जोरात 

प्रतिनिधी/ वास्को

वाडे वास्को येथील तळय़ाच्या सौदर्यीकरणाचे काम सध्या जोरात चाललेले आहे. या तळय़ाचे काम आतापर्यंत एwशी टक्के पूर्ण झालेले असून येत्या महिनाभरात उर्वरीत कामही पूर्ण होणार आहे. गणेश चतुर्थीला हे तळे नवा सांज चढलेल्या व सजलेल्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे.

   वाडे वास्कोतील अनेक वर्षे दुर्लक्षीत राहिलेल्या तळय़ाचे काम आता पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आलेले आहे. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होईल. सध्या कामाने जोर धरलेला आहे. तळय़ाभोवतीचा गटार, तळय़ाचा कठडा, फुटपाथ, गणेश विसर्जनाची सोय अशी कामे अंतीम टप्प्यात आलेले असून विधुत रोषणाईसाठी भुमीगत वीज जोडणीचे कामही पूर्ण झालेले आहे. लवकरच या तळय़ाभोवतील दिवे लागतील. रंगकामही होईल. तळय़ाच्या काठावर उभारण्यात आलेल्या खुल्या थिएटरचे कामही पूर्ण झालेले आहे.

  पुढील महिन्यात गणेश चतुर्थीपूर्वी या तळय़ाच्या सौदर्यीकरणाची सर्व कामे पूर्ण होईल. नव्या स्वरूपात व नवा सांज लेवून वाडेचे तळे यंदा गणेश भक्तांचे स्वागत करणार आहे. साधारण अडिच वर्षांपूर्वी वाडे वास्कोतील तळय़ाच्या सौदर्यीकरणाच्या कामाचा पाया माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते घालण्यात आला होता.  साधारण तेरा कोटी खर्चून हा विकास करण्यात आलेला आहे.

Related posts: