|Friday, March 22, 2019
You are here: Home » Top News » पुण्यामध्ये 12 नामांकित हॉटेल, पबवर छापे

पुण्यामध्ये 12 नामांकित हॉटेल, पबवर छापे 

ऑनलाईन टीम / पुणे :

रात्री-बेरात्री सुरू असलेल्या तरूणाईच्या धिंगाण्याला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी तब्बल 12 नामांकित पंचतारांकित हॉटेल, क्लब आणि हुका पार्लरमध्ये शनिवारी रात्री कारवाई केली आहे. मध्यरात्री एक वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईमध्ये या हॉटेल्सवर अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांत मध्यरात्रीनंतर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पब्सचे, क्लब्सचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे स्थानिकांना खूप त्रासही होतो. याबाबत अनेक तक्रारीही पोलिसांकडे आल्या होत्या. याच तक्रारिंची दखल घेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉम्बे पोलीस ऍक्ट अंतर्गत मॅक्लारेन पब, डेली ऑल डे, द बार स्टॉक, मियामी, जे डब्ल्यू मेरियेट हॉटेल चतुश्रुंगी, नाईट रायडर, नाईट स्काय, वेस्टइन, पेन्टहाऊस, हार्डरॉक, ओकवूड लाऊन्ज आणि ब्ल्यू शॅकवर कारवाई केली आहे. यातील बरेचसे हॉटेल्स हे पुण्यात प्रसिद्ध आहेत. जेव्हा कारवाई झाली तेव्हा या हॉटेलांमध्ये 7 हजार तरूण तरूणी उपस्थित होते. अपर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, तसेच 6 पोलीस निरीक्षक, 6 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 40 पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली आहे. पुण्यात तरूणाईचे रात्री-बेरात्री पब्समध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारीच्या प्रमाणताही वाढ झाली आहे.

Related posts: