|Friday, March 22, 2019
You are here: Home » Top News » चोरीच्या संशयातून हत्या ; 100 जणांवर गुन्हा

चोरीच्या संशयातून हत्या ; 100 जणांवर गुन्हा 

ऑनलाईन टीम / मुजफ्फरनगर :

देशभरात झुंडबळीच्या घटनांचे प्रमाण वाढले असतानाच, उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिह्यातील बिजोपुरा गावातही जमावानं चोरीच्या संशयातून एका तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 100 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिजोपुरा गावातील शेकडोंच्या जमावाने गुरुवारी रात्री चोरीच्या संशयातून कपिल त्यागी या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानं शेतातील पंप चोरी केल्याचा ग्रामस्थांना संशय होता. शेतमालकाने त्याला पकडले आणि इतर ग्रामस्थांनाही बोलावून घेतले. जमावाने त्याला फरफटत नेले आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याचवेळी कपिलच्या इतर दोन साथीदारांनी जमावाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. जमावाच्या मारहाणीत कपिल गंभीर जखमी झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तात्काळ कपिलला रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी 100 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related posts: