|Friday, March 22, 2019
You are here: Home » Top News » मुक्ताईनगर तालुक्यात पट्टेदार वाघ आढळला मृतावस्थेत

मुक्ताईनगर तालुक्यात पट्टेदार वाघ आढळला मृतावस्थेत 

ऑनलाईन टीम/ जळगाव :

मुक्ताईनगर तालुक्मयात रविवारी पुन्हा एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. हा घातपात आहे की वाघाचा नैसर्गिक मृत्यू? या बाबत शंका उपस्थित केली जात आहे. वर्षभरातील ही दुसरी घटना असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच वनविभागाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले जात आहे.

मुक्ताईनगर तालुक्मयात थेरोळा गावालगतच्या पूर्णा नदीपात्रात रविवारी सकाळी एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या वाघाच्या पायाला ठिबकच्या नळ्या बांधलेल्या आढळून आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वाघाच्या नैसर्गिक मृत्यूबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. मुक्ताईनगर तालुक्मयातच चार महिन्यांपूर्वी केळीच्या बागेत एका वाघीणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक पट्टेदार मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पट्टेदार वाघ ही प्रजाती लोप पावण्याच्या उंबरठय़ावर असताना प्रत्येक पट्टेदार वाघ वाचविण्याची गरज आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वढोडा वनक्षेत्राधिकारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. निसर्गचक्रातील वाघ हा महत्त्वपूर्ण घटक असल्याने ‘वाघ बचाव’ मोहीम देशभर राबविण्यात येत असताना वर्षभरात दोन पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts: