|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » वय विसरायला लावणारी प्रेम कहाणी तुला पाहते रे

वय विसरायला लावणारी प्रेम कहाणी तुला पाहते रे 

वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी घेऊन झी मराठी वेगळय़ा धाटणीची मालिका प्रेक्षकांसाठी सादर करत आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन करत छोटय़ा पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर तो टीव्ही मालिकेकडे परतला आहे. ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर  त्याजागी तुला पाहते रे ही नवी मालिका 13 ऑगस्टपासून रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वय विसरायला लावतं ते खरं प्रेम असं म्हणणारी तुला पाहते रे ही मालिका आहे ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची. विक्रम सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमॅन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी इशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर होतं हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल. मालिकेचे सर्व प्रोमो पाहता मालिकेत भव्यता दिसून येते. या मालिकेतून पुण्याची ‘गायत्री दातार’ ही नवोदित अभिनेत्री छोटय़ा पडद्यावर पदार्पण करत आहे.

Related posts: