|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » जातीपाती, गटातटाचे राजकारण विसरल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल-मुख्यमंत्री

जातीपाती, गटातटाचे राजकारण विसरल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल-मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / पुणे :

राज्यात आतापर्यंत जलसंधारणाचे काम न होण्यामागची दोष कोणाचा? नागरिकांना या साठी दोषी धरता येणार नाही. मात्र गावागावांतील गटतट, जातीपाती, आणि राजकीय पक्षांमुळे जलसंधारणासाठी चा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ चा नारा ‘इतरांना अडवा आणि त्यांची जिरवा’ असा झाला. त्यामुळे महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी जातीपाती, गटातटाचे राजकारण विसरायला हवे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

  • वाटर कप स्पर्धा

1) पहिले पारितोषिक – टाकेवाडी, माण सातारा

  • दुसरे विभागून

1) सिडखेड, मोताळा, बुलढाणा

2) भांडवली, माण, सातारा

  • तिसरे पारितोषिक विभागून

1) आनंदवाडी, आष्टी, बीड

2) उमठा,लारखेड, नागपूर

पाणी फाऊंडेशन तर्फे आयोजित वाटत कप 2018 स्पर्धेतील विजेत्या गावांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आहे. त्या वेळी ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्य मंत्री राम शिंदे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमख्यमंत्री अजित पवार, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते अमीर खान, किरण राव, फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ आदी या वेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणजे, लोकचळवल शिवाय जलसंधारणाचे काम होऊ शकत नाही. परंतु, गावागावांतील गट तट, जात पात आणि पक्षांमुळे लोकचळवळ उभी राहत नाही. हीच गोष्ट पाणी फौंडेशनने हेरली आणि पाणी प्रश्नाचे उत्तर लोकचळवलीत असल्याचे सांगत समाज एकत्र केला. त्यातून पाणी फाऊंडेशनचे जलसंधारणाचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. परिवर्तन कोणी बाहेरून येऊन करत नाही. सामान्य माणसाचे असामान्यत्व जागृत झाल्यावर असामान्य कार्य घडत. त्यातूनच परिवर्तन घडते. पाणी फाउंडेशनने नागरिकांमधून हे असामान्यत्व जागृत करण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. निसर्गाने आपल्याला नेहमी भरभरून दिले. मात्र माणसाच्या अमर्याद वापरामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. सध्या जलसंधारणाच्या कामामुळे राज्यात पाण्याची पातळी वाढत आहे. मात्र, त्याचा योग्य वापर व्हावा यासाठी पीक पद्धतीचे योग्य नियोजन व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले.