|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » काहीजण बोलघेवडय़ासारखे बोलतात ; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

काहीजण बोलघेवडय़ासारखे बोलतात ; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला 

ऑनलाईन टीम / पुणे :

आमिर आणि पाणी फाऊंडेशन खुप चांगले काम करत आहेत. परंतु कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन तुमच्यावर शिक्का मारून घेऊ नका. तुमच्यावर कोणाचा शिक्का नाही म्हणून ही जनता आज तुम्हाला प्रतिसाद देत आहे. असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमिर खान यांना दिला. तसेच काहीजण बोलघेवडय़ा सारखे बोलतात, त्यांना केवळ सभा घेऊन जायच्या असतात असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

 

  • वाटर कप स्पर्धा

1) पहिले पारितोषिक – टाकेवाडी, माण सातारा

  • दुसरे विभागून

1) सिडखेड, मोताळा, बुलढाणा

2) भांडवली, माण, सातारा

  • तिसरे पारितोषिक विभागून

1) आनंदवाडी, आष्टी, बीड

2) उमठा,लारखेड, नागपूर

पानी फाऊंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळय़ात पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते. अजित पवार म्हणाले, आम्ही सर्व राजकीय पक्षाचा शिक्का असलेले कार्यकर्ते आहोत. आज जनता तुम्हाला प्रतिसाद देतीये कारण तुमच्यावर कुठल्याही पक्षाचा शिक्का नाही. येणारे वर्ष निवडणुकांचे असले तरी तुमचा 2019 चा वॉटर कप झाला पाहिजे. राज्यातील काही धरणे आज 100 टक्के भरली आहेत. परंतु काही जिह्यात अजूनही पाण्याची गरज आहे. भूगर्भातील पाणी वाढते तेव्हा शेतकरी जास्त पाणी लागणारी पिके घेतात. त्यामुळे पीक पद्धतीचा विचार करणेही आवश्यक आहे. पाण्याचा उपसा कसा होतो, हे पाहणं गरजेचे आहे. श्रमदान, लोकसहभागाचं सातत्य टिकले पाहिजे. आमिर खान यांनी या उपक्रमासाठी महाराष्ट्र निवडला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी सत्यमेव जयते हा कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची विनंती सुद्धा अजित पवार यांनी आमिर खान यांना केली. तसेच किरण राव करेल तेच गाव करेल अशी नवीन म्हण सुद्धा अजित पवार यांनी यावेळी तयार केली.