|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पं.स.इमारतीचे काम निकृष्ट

पं.स.इमारतीचे काम निकृष्ट 

वैभववाडीत कार्यकारी अभियंत्यांना विचारला जाब

वार्ताहर / वैभववाडी:

वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे बांधकाम निकृष्ट झाले असून ही इमारत ताब्यात घेऊ नये. विकासकामांच्या दर्जाबाबत आपण कधीही तडजोड करणार नाही, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना दिला.

येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीदरम्यान आमदार राणे यांनी पं. स. च्या नूतन इमारतीची पाहणी केली. आमदार राणे यांनी बांधकाम कार्यकारी अभियंता खांडेकर यांना निकृष्ट कामाबाबत जाब विचारत, ‘आम्ही गळकी इमारत ताब्यात घ्यायची का?’ असा सवाल उपस्थित केला. याबाबत ठेकेदाराला पाठीशी घातले जाणार नाही. येत्या आमसभेत हा मुद्दा उपस्थित करून यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे सूचविले. यावेळी वैभववाडी सभापती लक्ष्मण रावराणे, हर्षदा हरयाण, मंगेश लोके, अरविंद रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, प्राची तावडे आदी उपस्थित होते.

Related posts: