|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दिल्लीतील ‘त्या’ घटनेच्या व्हायरल व्हीडिओबाबत चौकशी व्हावी!

दिल्लीतील ‘त्या’ घटनेच्या व्हायरल व्हीडिओबाबत चौकशी व्हावी! 

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे कणकवली पोलिसांना निवेदन

वार्ताहर / कणकवली:

दिल्ली येथील जंतरमंतरवर काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जातीय आकस  असल्यामुळे आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. दोन्ही कृत्ये कायद्याने गुन्हा आहेत, याची माहिती असताना या समाजकंटकांनी असे कृत्य करून त्यांनी व्हीडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तो व्हीडिओ कणकवलीतही पाहिला असल्यामुळे अशाप्रवृत्तींच्या विरोधात चौकशी करण्याची मागणी माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

कणकवली पोलीस ठाणे येथे संविधान बचाव संघटनेच्यावतीने पोलीस निरीक्षकांची भेट घेण्यात आली. यावेळी बौद्ध सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष सुजीत जाधव, महासचिव प्रदीप सर्पे, डॉ. व्ही. जी. कदम, संजय कदम, सचिन तांबे, आनंद तांबे, प्रज्ञा सर्पे, माजी नगरसेवक गौतम खुडकर, पं. स. सदस्य गणेश तांबे, सिद्धार्थ तांबे, विलास कदम, सुभाष वरवडेकर, सुहास कदम, अनिकेत पवार, नरेंद्र ताबे, रवींद्र तांबे, किरण कदम, किशोर कदम, बाबुराव सावडावकर, संदीप तांबे, अशोक कांबळे, अजय तांबे, महेंद्र पवार, नारायण जाधव, प्रसाद जाधव, अमित जाधव, सचिन कासले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली बुद्धविहार येथे संविधान बचाव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात ज्या समाजकंटकांनी संविधनाची प्रत जाळली त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.