|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » क्रिडा » कंबोडिया फुटबॉल संघाच्या व्यवस्थापकपदी होंडा

कंबोडिया फुटबॉल संघाच्या व्यवस्थापकपदी होंडा 

वृत्तसंस्था/ फिनॉमपिने

कंबोडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या सरव्यवस्थापकपदी जपानचा आघाडीफळीत खेळणारा माजी अव्वल फुटबॉलपटू केसुकी होंडाची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी कंबोडियाच्या फुटबॉल फेडरेशनने ही घोषणा केली.

गेल्या महिन्याच्या प्रारंभी जपानच्या होंडाने ए-लीग फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपद मिळविणाऱया मेलबोर्न संघाशी करार केला होता. तसेच तो गेल्या जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त झाला होता. रशियात झालेल्या फिफा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत जपानला बेल्जियम संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर होंडाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. कंबोडिया बरोबर होंडाने सरव्यवस्थापकपदाचा दोन वर्षांचा करार केला आहे. होंडा आपल्या फुटबॉल कारकीर्दीत एसी मिलान संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. जपानकडून खेळताना त्याने 98 आंतरराष्ट्रीय सामन्यात 37 गोल नोंदविले आहेत.