|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » निकी पुनाचाला एकेरीचे जेतेपद

निकी पुनाचाला एकेरीचे जेतेपद 

वृत्तसंस्था/ पुणे

इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या 25 हजार अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या निकी पुनाचाने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. निकीच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हे एकेरीचे पहिले विजेतेपद आहे.

शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात 23 वर्षीय निकीने ऑस्ट्रेलियाच्या 30 वर्षीय मिचेल लुकचा 53 मिनिटाच्या कालावधीत 6-3, 6-1 असा पराभव केला. हार्डकोर्टवर झालेल्या या स्पर्धेत निकीने 27 एटीपी गुण आणि 3600 डॉलर्स (2.5 लाख रूपये) कमाई केली. निकीचा जन्म तामिळनाडू झाला असून तो बेंगळूरमधील रोहन बोपण्णा टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.