|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » क्रिडा » एशियाडमध्ये पदक जिंकणे आव्हानात्मक : सरदार सिंग

एशियाडमध्ये पदक जिंकणे आव्हानात्मक : सरदार सिंग 

वृत्तसंस्था/ चंदीगड

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार व मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदार सिंगने आगामी आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणे हे भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल, असे म्हटले आहे. सध्या भारतीय संघ आशियाई देशांमध्ये प्रबळ दावेदार म्हणून खेळणार असला तरी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल, असे सरदारने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

‘भारत या स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून उतरणार असला तरी मैदानावर सर्वोत्तम योगदान द्यावे लागेल. येथे सुवर्ण जिंकत टोकिओ ऑलिम्पिकची थेट पात्रता गाठणे हे आमच्यासमोर मोठे दिव्य असणार आहे. अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीत रौप्यपदक जिंकल्यामुळे आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज संघांना नमवल्यामुळे आशियाई स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे. याशिवाय, आम्ही कोणत्याही संघाला कमी लेखण्याची चुक करणार नसल्याचे सरदारने यावेळी स्पष्ट केले.

Related posts: