|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मोपा विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्यावे

मोपा विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्यावे 

पुण्यतिथी कार्यक्रमात दीपक ढवळीकर यांची मागणी

वार्ताहर/ मडकई

मोपा येथे होऊ घातलेल्या आंतराराष्ट्रीय विमानतळाला स्व. भाऊसाहेब बांदोडकरांचे नाव द्यावे अशी मागणी म. गो. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केली. फर्मागुडी येथे भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. म. गो. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाऊसाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

  भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे स्फूर्तीस्थान आहेत. मुक्तीनंतर राज्याच्या विकासासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिले. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच गोव्याच्या विकासाला खऱयाअर्थाने चालना मिळाली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य चित्रा फडते, बबिता गावंकर, बांदोडय़ाचे सरपंच अजय नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, उपसरपचा मनुजा नाईक, अभय प्रभू, फोंडय़ाचे नगरसेवक व्यंकटेश उर्फ दादा नाईक, तळावलीचे पंचसदस्य नारायण शेणवी तळावलीकर, मडकईचे पंचसदस्य विशांत नाईक, माजी पंचसदस्य भारत नाईक, तिवरे वरगांव पंचायतीचे पंच सदस्य फाँन्सिस लोबो, दुभार्ट आगापूरचे पंचसदस्य राजेश नाईक, मशाल आडपईकर, म. गो. केंद्रीय समितीचे पदाधिकारी प्रताप फडते, दामू दिवकर, फोंडय़ाचे म. गो. गटाध्यक्ष अनिल नाईक, फोंडय़ातील  युवा नेते डॉ. केतन भाटिकर, माजी नगरसेविका निधी मामलेकर, विद्या पुनाळेकर, वेलिंग प्रियोळचे पंचसदस्य दामोदर नाईक, माजी पंचसदस्य पांडुरंग गावडे, तसेच आजी माजी पंचसदस्य व म. गो. कार्यकर्त्यांनी  पुष्पहार अर्पण करून भाऊसाहेबांना आदरांजली वाहिली.