|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हापसा येथे भाऊसाहेब बांदोडकर यांना अभिवादन

म्हापसा येथे भाऊसाहेब बांदोडकर यांना अभिवादन 

प्रतिनिधी/ म्हापसा

भाऊसाहेब बांदोडकर यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविली. कुठल्याही जाती धर्माच्या प्रगतीसाठी त्यांनी शिक्षणाच्या माध्यमाद्वारे कार्य केले. भाऊसाहेब हे मुक्त गोव्याचे भाग्यविधाते आहेत, असे प्रतिपादन म्हापसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी केले. म्हापसा येथील भाऊंच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी त्यांच्यासमवेत सुडाचे उपाध्यक्ष संदीप फळारी, तुषार टोपले, सुषांत हरमलकर, रोहन कवळेकर, माजी नगराध्यक्ष आशिष शिरोडकर, अजित मांद्रेकर, प्रकाश धुमाळ, सतीश पार्सेकर उपस्थित होते.

तत्पूर्वी म्हापसा मगो पक्षाचे गटाध्यक्ष भारत तोरस्कर, विनोद उर्फ बाळू फडके, माजी नगरसेवक गुरुदास वायंगणकर, रामदास फळारी, प्रेमानंद दिवकर, रमेश मणेरकर, एकनाथ म्हापसेकर, भाई मोये, महेश शिरगावकर, गिरीश कुंकळकर, सदाशिव दिवकर, सुरेश डांगी, सचिन किटलेकर, सुभाष पार्सेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच गोमंतक मराठा समाजाच्या नेत्यानींही भाऊसाहेब बांदोडकर यांना आदरांजली वाहिली.

Related posts: