|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आग्वाद तुरूंग म्युझियम बनविण्यासाठी नगरनियोजन खात्याकडून हिरवा कंदिल

आग्वाद तुरूंग म्युझियम बनविण्यासाठी नगरनियोजन खात्याकडून हिरवा कंदिल 

प्रतिनिधी/ पणजी

आग्वाद तुरूंग म्युझियम बनविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून नगरनियोजन खात्याने त्यास नाहरकत दाखलाही दिलेला आहे. सरकारने यासाठी 25 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याचे काम पुढील महिन्यापासून हाती घेण्यात येणार आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊ साहेब बांदोडकर यांचा संपूर्ण इतिहास तसेच स्वातंत्र्यासाठी बलीदान दिले वा झटले त्या सर्वांचे पुतळे आणि त्यांच्या नावाचे सेल (रूम) आतमध्ये उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती उपसभापती मायकल लोबो यांनी दिली.

गुन्हेगारीला थारा नाही

कळंगुट समुद्र किनाऱयावर 70 ते 1 लाखपर्यंत पर्यटक दर महिना येत असतात. त्याबरोबर येथे नको असलेल्या गोष्टीही घडत असतात. मात्र त्यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. चूक होते तेथे कारवाई होणे आवश्यक आहे. पोलिसांचे भयही असणे गरजेचे आहे. समुद्रकिनारी भागात गुन्हेगारांना थारा नाही असा आदेश मुख्यमंत्री व आपणही पोलिसांना दिला आहे असे लोबो पुढे म्हणाले.

रस्ते हॉटमिक्स, चर बुझविण्यास 220 कोटी मंजूर

कळंगुट भोवताल परिसर, कांदोळी, पिळर्ण दरम्यान, कोकेरो सर्कल ते डोलफीन सर्कल दरम्यान येत्या चतुर्थीनंतर सर्व रस्त्यावरील चर बुझविण्यात येईल. यासाठी सरकारकडून 220 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे त्याद्वारे सर्व रस्ते हॉटमिक्स करून चकाचक करण्यात येईल अशी माहिती लोबो यांनी दिली.

राज्यात मटका फोफावला आहे हे खरे असले तरी गुन्हा अन्वेषण विभगाच्या पोलिसांनी नजर ठेवून त्यांना पकडले आहे ही चांगली गोष्ट आहे. कळंगुटमधील गुन्हेगारीचे मुळ कळंगुटमध्येच आहे असे बोलले जाते यासाठी पोलीसही गुन्हेगाऱयांना पडकण्यात सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

मद्यपान करून वाहने हाकणाऱयांना थेट जेल

स्व. भाऊसाहेबांनी शिक्षणामध्ये योगदान दिले आहे. वाडा एक शाळा हे धोरण आखले. युवकांनी भाऊ साहेबांची शिकवण घ्यावी असेही लोबो म्हणाले. राज्यात मद्यपान करून वाहने हाकणाऱयावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. काल एकाच दिवसात 35 जणांना दंड देण्यात आला. यापुढे दारू पिऊन वाहने हाकतात त्यांना थेट जेलमध्ये घालण्याच्या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी माजी सरपंच एंथोनी मिनेझीस, कांदोळी पंच रामकृष्ण केरकर, निमंत्रक एकनाथ नागवेकर, अर्जुन शिरोडकर, राजेंद्र कोरगांवकर, स्वा. सै. सिप्रियान डिसोझा, प्रतिभा नार्वेकर यांनी एथोनी डिसोजा यांची संयुक्त भाषणे झाली. माजी सरपंच चानू चोडणकर यांनी आभार मानले.

Related posts: