|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » गरीबनाथ मंदिरात चेंगराचेंगरीत 25 भाविक जखमी

गरीबनाथ मंदिरात चेंगराचेंगरीत 25 भाविक जखमी 

ऑनलाईन टीम / मुझफ्फरपूर :

बिहारच्या मुझफ्फरपूरमधील गरीबनाथ मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 25 भाविक जखमी झाले असून, जखमींमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.

श्रावणी सोमवारनिमित्त गरीबनाथ मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी लाखेंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. बाबा गरीबनाथ मंदिरातील गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 25 भाविक जखमी झाले असून जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाच्या मदतीने मंदिरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आणली गेल्याने पुढील अनर्थ टळला आहे.