|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » अनुसूचित जमातीमध्ये समावेशासाठी धनगर समाज आज रस्त्यावर उतरणार

अनुसूचित जमातीमध्ये समावेशासाठी धनगर समाज आज रस्त्यावर उतरणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्यभरात आंदोलन करणार आहे. अमरावती-नागपूर महामार्ग आणि मनमाडमध्ये धनगर बांधव शेळय़ामेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत.

औरंगाबाद, जळगावमध्ये रास्ता रोको तर जालना-औरंगाबाद महामार्गावरील बदनापुरात गोंधळ आंदोलन करण्यात येईल. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरही धरणे आंदोलनाचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याची मागणी आंदोलकांची आहे. धनगर आणि धनगड अशा दोन वेगळय़ा जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. तसे प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिले. मात्र धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरच्या आत ही चूक दुरूस्त केली नाही तर 5 लाख धनगर मिळून औरंगाबादेत एल्गार पुकारतील असा इशारा धनगर समाजाने यापूर्वीच दिला होता. आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न पेटला तेव्हा देवेंद्र फडणवीस स्वतः धनगरांच्या व्यासपीठावर गेले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र 4 वर्ष झाली तरी फडणवीसांनी धनगर आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवल्याचा आरोप आहे.