|Monday, September 24, 2018
You are here: Home » Top News » माजी महापौरांचा फोन टॅप केल्याप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

माजी महापौरांचा फोन टॅप केल्याप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेनेतील ईशान्य मुंबईमधला पक्षांतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे. माजी महापौर आणि विभागप्रमुख दत्ता दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

ईशान्य मुंबईत दत्ता दळवी, जगदीश शेट्टी आणि दीपक सावंत यांच्यात अंतर्गत वाद सुरु सुरु होते. याच वादातून माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक सातचे विभागप्रमुख असलेल्या दत्ता दळवी यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला. दळवी यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जगदीश शेट्टी यांचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासोबत चांगले संबंध असल्यानं शेट्टींना शिवसेनेतून हाकलल्याचे म्हटले जाते. शाखाप्रमुख दीपक सावंत यांनी पक्षविरोधी बैठका घेतल्यामुळे त्यांनाही पक्षातून काढण्यात आले. अनेक वर्षानंतर शिवसेनेकडून पदाधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली.

Related posts: