|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » मानस तर्फे पोलिसातील माणसाला मुजरा

मानस तर्फे पोलिसातील माणसाला मुजरा 

ऑनलाईन टीम / पुणे :

मानस मल्टीमिडिया तर्फे ‘उडान-2018, पोलीसातील माणसाला मानाचा मुजरा!’ हा कार्यक्रम गुरूवार 16 ऑगस्ट रोजी सायं. 5 वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार भवनमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आली आहे. याप्रसंगी मानसचे सदस्य उपस्थित होते.

जनतेसाठी 24 तास अखंड सेवेत असणाऱया पोलीसांसाठी त्यांच्या शौर्याबद्दल, पराक्रमाबद्दल एक मानाचा मुजरा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रपती पुरस्कार मिळलेले व यंदा जाहिर झालेल्या पोलीसांचा कार्यक्रमांतर्गत खास सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पोलीसांना व त्यांच्या कुटुंबियांसाठी मनोरंजनांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार असुन यामध्ये विशेषकरून पुण्यामधील सिने-नाटय़ कलाकार सहभाग घेऊन मनोरंजन करणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आला.

Related posts: