|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » काजू अभ्यास समितीची 15 ऑगस्ट रोजी बैठक

काजू अभ्यास समितीची 15 ऑगस्ट रोजी बैठक 

वार्ताहर / कणकवली:

 सिंधुदुर्गातील काजू उत्पादनावर उपाययोजना सुचविण्याकरीता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक 15 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रधान कार्यालयात दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंधुदुर्ग दौऱयावर आल्यावर राज्य शासन काजू उत्पादनाबाबत ठोस भूमिका घेईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हय़ातील काजू उत्पादक, उद्योजक व लोकप्रतिनिधींचा या समितीत समावेश असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी दिली.

येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काळसेकर बोलत होते. यावेळी प्रभाकर सावंत, अमित आवटे आदी उपस्थित होते. काळसेकर म्हणाले, या समितीमार्फत काजू उद्योगाबाबत अभ्यास करून शासनाला उपाययोजना सूचवायच्या आहेत. या समितीत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अजित गोगटे, अमित आवटे आदींचा समावेश करण्यात आला आहे. कणकवलीऐवजी ओरोस येथे ही बैठक होणार आहे.