|Friday, July 19, 2019
You are here: Home » उद्योग » गुंतवणूकदारांच्या माहितीची चोरी रोखण्यासाठी पावले

गुंतवणूकदारांच्या माहितीची चोरी रोखण्यासाठी पावले 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गुंतवणूकदारांची गोपनीय माहिती जपण्यासाठी सेबीकडून कठोर पावले उचलण्यात येत आहे. ब्रोकर्सकडून या माहितीची विक्री होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त भांडवली बाजार, डिपॉझिटरीज् आणि सेबी यांच्यादरम्यान माहितीची देवाणघेवाण होण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे.

काही स्टॉक ब्रोकर्स ग्राहकांच्या माहितीचा गैरवापर करत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. सेबीकडून 2017-18 साठी वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून ग्राहकांच्या माहितीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बेकायदेशीर अथवा फसवे व्यवहार करण्यासाठी शेल कंपन्यांचा वापर होत असल्याचे गेल्या वर्षी उघडकीस आले होते. गुंतवणूकदारांकडून पैशांच्या अफरातफरी विरोधी कायद्याच्या नियमावलीखाली कायदेशीर तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे, असे सांगण्यात आले. सेटलमेन्टसंदर्भातील नियमावलींचा आढावा घेण्यात येईल, असे सेबीकडून सांगण्यात आले.