|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय टेबल टेनिसपटूंना दोन पदके

भारतीय टेबल टेनिसपटूंना दोन पदके 

वृत्तसंस्था/ मुंबई

नायजेरिया खुल्या 2018 च्या आयटीटीएफ चॅलेंज सीमास्टर टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या टेबल टेनिसपटूंनी एक रौप्य आणि एक कास्य अशी दोन पदके पटकाविली.

21 वर्षाखालील वयोगटाच्या पुरूष एकेरीत भारताच्या रोनित भांजाने रौप्य पदक तर पुरूष दुहेरीत अभिषेक यादव, सार्थक गांधी यांनी कास्यपदक मिळविले. रोनितने पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीत फलानाचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याला इटलीच्या ऍमेटोने चांगलेच दमविले. ऍमेटोने पहिला सेट 12-10 असा जिंकला नंतर रोनितने दुसरा सेट 11-3 असा जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर रोनितने तिसरा सेट गमविला पण पुढील दोन सेट जिंकून त्याने ऍमेटोचा 3-2 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत रोनितने इजिप्तच्या महमूद हेल्मीचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पण चीनच्या शाओबो वांगने रोनितचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. पुरूष दुहेरीत यादव आणि गांधी यांनी इजिप्तच्या हेल्मी आणि झियाद वाएल यांचा पहिल्या फेरीत 3-1 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत रॉबिनॉट आणि सेप्रेड यांनी यादव आणि गांधी यांचा 11-9, 13-11, 11-6 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. यादव व गांधी यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.