|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे अटकेत

मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे अटकेत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव संजय तुर्डे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केल्याच्या आरोपानंतर, नगरसेवक तुर्डे यांना अटक करण्यात आली आहे.

 

कुर्ला इथं शौचालय बांधकामात होत असलेल्या दिरंगाईमुळे, नगरसेवक तुर्डे यांनी थेट कॉनट्रक्टर आणि इंजिनियरला मारहाण केल्याचा आरोप आहे. सोमवारी रात्रीच्या या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरुन कुर्ला पोलिसांनी तुर्डेंना अटक केली आहे.