|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » बाजीराव – मस्तानी 20 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार

बाजीराव – मस्तानी 20 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण व रणवीस सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला इटलीत हे दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळाली आहे.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार दीपिका आमि रणवीरसाठी आयुष्यातील हा क्षण खूप खास असल्याने फक्त काही जवळच्या मित्र परिवाला आमंत्रण देण्यात येणार आहे. लग्न इटलीमधील लेक कोमोमध्ये होणार आहे. रणवीर आणि दीपिकाचे हे फेव्हरेट ठिकाण आहे. यानंतर रणवीर आणि दीपिका भारतात येऊन सुद्धा रिसेप्शन देणार आहेत .एक रिसेप्शन मुंबईत होणार आहे तर दुसर दीपिकाचे होम टाऊन बेंगळुरुमध्ये होईल. दोघांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे. लग्नासाठी दीपिकाने सध्या कोणताच प्रोजेक्ट साईन केले नसल्याचे समजते.

 

Related posts: