|Sunday, June 16, 2019
You are here: Home » विविधा » स्त्रियांना आरोग्याबाबत सजग करणार;  पुण्याच्या डॉ. राधिका वाघ यांचा निर्धार

स्त्रियांना आरोग्याबाबत सजग करणार;  पुण्याच्या डॉ. राधिका वाघ यांचा निर्धार 

 पुणे / प्रतिनिधी :

स्त्रीरोगतज्ञ असल्याने स्वाभाविकच स्त्रियांसाठी विशेष कार्यशील रहाणार असून, स्त्रियांना आरोग्याबाबत सजग करण्यावर विशेष भर देणार आहे. त्याचबरोबर गरजू मुलांना नागरिकांनी दत्तक घ्यावे, यासाठी जनजागृती करणार असल्याचे ‘मिस युनायटेड नेशन्स ग्लोब 2018’चा किताब पटकावणाऱया पुण्याच्या डॉ. राधिका वाघ यांनी सोमवारी येथे सांगितले.

किंग्स्टन शहरात 21 ते 28 जुलैदरम्यान ‘युनायटेड नेशन्स 2018’ या आंतरराष्ट्रीय पेजेंटच्या ‘मिस युनायटेड नेशन्स ग्लोबल 2018’मध्ये डॉ. राधिका वाघ यांनी सहभाग घेतला होता. या किताबासाठी भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी जगभरातील 30 सौंदर्यवतींवर मात करत या किताबावर आपली मोहोर उमटविली. विशेष म्हणजे या पेजेंटमध्ये केवळ सौंदर्यासह सामाजिक कार्यालाही तितकेच महत्त्व दिले गेले. या स्पर्धेत स्पर्धकांना डुन्न नदीत सफर, 100 पेक्षा जास्त मुलांच्या जमेकामधील अनाथाश्रम आणि शाळांमध्ये रंगकाम, त्या मुलांसाठी स्वयंपाक बनविणे यांसह प्राथमिक मुलाखत, नॅशनल कॉश्चुम राऊंड आणि अंतिम फेरीचा समावेश होता. 7 दिवसांच्या या उपक्रमात सहभागी सौंदर्यवती स्पर्धकांकडून वेगवेगळे सामाजिक उपक्रमही राबवून घेण्यात आले. संपूर्ण जगभरातून आलेल्या सौंदर्यवतींमध्ये पुण्याच्या डॉ. राधिका वाघ यांचे सौंदर्य व सामाजिक कार्य सरस ठरले. त्यामुळे त्यांना हा किताब बहाल करण्यात आला. या किताबापूर्वी डॉ. राधिका वाघ यांनी मिसेस महाराष्ट्र 2016 व मिसेस इंडिया ब्युटिफूल 2017 हे किताबही पटकावले आहेत.

स्त्राrरोगतज्ञ असलेल्या डॉ. राधिक वाघ यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले, की स्त्रिया अशा जागतिक इव्हेंटपासून दूर रहातात. मात्र, त्यांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यामुळे स्वतःतील आत्मविश्वास दुणावतो. याचबरोबर असे किताब पटकावल्यानंतर तुम्ही अधिक सामाजिक उपक्रम उत्तमप्रकारे राबवू शकता. हा प्रवास माझ्यासाठी खूप उत्सुकतेचा ठरला. यशस्वी पुरूषामागे एक स्त्राr असते, तर माझ्या या यशस्वितेत माझे पती डॉ. कुलदीप खंबीरपणे उभे होते. त्यामुळेच मीही वाटचाल करू शकले.

डॉ. कुलदीप वाघ म्हणाले, माझ्या पत्नीने मिळविलेल्या या यशाने आपण आनंदीत आहोत. रुग्णालय हेच तिचे पहिले घर आहे. त्यामुळे तिला सामाजिक जाणीव पहिल्यापासूनच होती. त्याचा फायदा या किताबाच्या स्पर्धेत झाला. लग्न झाल्यानंतर पती-पत्नी एक होतात. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची ऊर्जा पेरणास्त्रात ठरत असते. त्याप्रमाणे माझीही तिला तशी साथ मिळाली. तसेच यामध्ये गोल्डन पिरॅमिड एन्टटेन्मेंटच्या प्रशांत व राधिका सोलापूरकर यांचे सहकार्यही मोलाचे ठरले आहे.