|Monday, June 17, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य दिव्यत्वाची जेथे प्रचिती

राशिभविष्य दिव्यत्वाची जेथे प्रचिती 

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे परमेश्वरी वास!

बुध. दि. 15 ते 21 ऑगस्ट 2018

हल्ली लोक नको त्या चमत्कार करणाऱयाला नमस्कार करतात. एखाद्याला खेळातला देव बनवितात. पण खरोखर जो समाजाच्या उपयोगी पडतो. माणुसकी जेथे असेल त्यांना मात्र कुणीच किंमत देत नाहीत. जगाच्या कल्याणासाठी झटणाऱया अनेक व्यक्ती या जगात आहेत. वास्तविक अशा लोकांचा सत्कार  व्हायला हवा. पण जनता अथवा सरकार कुणाकडूनही त्याची दाद घेतली जात नाही. मुंबईत परळ येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलसमोर एक तरुण रोज येणाऱया रुग्णांना पहायचा. या रुग्णांकडे पैसे नसत. खायला अन्नपाणी नसे. कुणाला भेटावे ते कळत नसे. त्या तरुणाने आपले चांगले चाललेले हॉटेल भाडय़ाने दिले  व त्यातून आलेल्या पैशातून त्या रुग्णांसाठी हॉस्पिटलसमोर एका चाळीत रस्त्यावर अन्नछत्र सुरू केले. दोन तीन डॉक्टरांची नेमणूक केली. गरजुंना मोफत औषधही देणे सुरू केले व त्या रुग्णांचे आशीर्वाद घेतले आज त्याचा वटवृक्ष झाला. गेली 29 वर्षे त्याचा हा उपक्रम सुरू असून आतापर्यंत 10 ते 12 लाख लोकांना त्यांनी अन्नछत्रातून गोरगरीबांना आधार दिला. पण सरकार अथवा जनता  कुणालाही याचे सोयरसुतक नाही. अथवा त्यांचा सत्कार करावा, असेही कुणाला वाटले नाही. नुकत्याच 2016 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडू तरुणीने सुवर्ण पदक जिंकल्यामुळे तिच्यावर अभिनंदन व बक्षिसांची कोटय़वधी डॉलर्सची खैरात झाली पण तिने ते नम्रपणे नाकारले, आपल्या गावात वीज नाही, मुलांना शिक्षण घेणे जमत नाही, हॉस्पिटले नाहीत, त्यासाठी ती रक्कम खर्चकरावी असे तिने सांगितले. देशासाठी खेळून आपण सुवर्णपदक जिंकलेले आहे. त्यामुळे मिळणारे मानधन व बक्षिसावर आपल्या राष्ट्राचाच हक्क आहे असे तिने सांगितले. तिच्या या वागण्याने सारे जग नतमस्तक झाले. आतापर्यंत आपल्या देशातल्या एका तर राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूने अथवा टॉपवरील चित्रपट अभिनेत्याने मनाचा इतका मोठेपणा दाखविला आहे. काय? आपल्या देशात क्रिकेटवीराला देवत्व बहाल केले जाते. एखाद्या अभिनेत्याच्या आरोग्यासाठी देशभर प्रार्थना केल्या जातात. त्यांना सरकारतर्फे  सर्व  सुखसोयी व सवलती दिल्या जातात, पण या लोकांनी देशासाठी काय केले हा संशोधनाचा विषय आहे. शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यानी एका क्रिकेटवीराला चांगलेच सुनावले होते. तू देशासाठी खेळत नाहीस तर फक्त पैशासाठी खेळतोस, असे त्याला स्पष्टपणे सुनावले होते, असे म्हणतात.  वास्तविक जे खरोखर समाजाला उपयोगी पडतात. त्यांच्यासाठी राबतात, जीवाला जीव देतात, त्यांचा खऱया अर्थाने सत्कार व्हायला हवा. पण तसे होत नाही. लोक नको त्या माणसाला डोक्मयावर घेतात. वास्तविक आज समाजाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे. जन्मकुंडलीत पूर्वजन्माचे पापपुण्य म्हणून एक प्रकार असतो. ज्याची पुण्याई शिल्लक असते त्याच व्यक्तीच्या हातून लोकांचे व पर्यायाने देशाचे कल्याण होते व अशी माणसं क्वचितच जन्माला येतात. अशा दिव्य व्यक्ती असतील तर त्यांच्यासमोर नतमस्त व्हा असे सांगावे लागत नाही व अशाच लोकांच्या ठिकाणी खरे देवत्व असते. आज जरी समाजाने अथवा सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तरी त्यांनी केलेल्या या पुण्याईमुळे त्याची पुढील पिढी नक्कीच राजऐश्वर्यात लोळेल यात शंका नाही. कारण पाप असो वा पुण्य त्याचे फळ आज ना उद्या मिळणारच हा निसर्गाचा नियम आहे.

 

मेष

सरकारी कामातील अडथळे दूर होतील. मान सन्मान प्रति÷ा वाढेल. संततीविषयक सर्व इच्छा पूर्ण होतील. हर्षलचा प्रभाव असल्याने सर्व बाबतीत सावध राहूनच कामे करावी लागतील. महत्त्वाच्या गुप्त गोष्टींची वाच्यता करू नका. अन्यथा शत्रू त्याचा गैरफायदा घेण्याची शक्मयता आहे. पै-पाहुण्यांसाठी खर्च करावा लागेल.


वृषभ

वाहन दुरुस्ती, घराची डागडुजी, यासाठी खर्च होईल. अनेक मार्गाने धनलाभाची शक्मयता. संततीच्या बाबतीत अविस्मरणीय घटना. विवाह व नोकरी व्यवसायात चांगले यश. काही नको त्या प्रकरणामुळे घरमालक व भाडेकरू संबंध बिघडतील. त्यासाठी पूर्ण माहिती काढल्याशिवाय कुणालाही जागा देऊ नका.


मिथुन

भाग्योदय भरभराटीच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल. अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्याला उत्कर्षाची झालर लागेल. आगामी पंधरवडय़ात महत्त्वाची घटना घडण्याचे योग. अचानक बदली, नोकरीत स्थलांतर अथवा जादा जबाबदारी पडेल, पण ती पुढील भवितव्याबाबतीत शुभ ठरणार आहे.


कर्क

कर्माच्या अथवा पूर्व पुण्याईमुळे आयुष्यात कधीही पाहिला नसाल अथवा अनुभवला नसाल असे मोठे यश किंवा ऐश्वर्य लाभेल. पण मूळ कुंडलीची बैठकदेखील तशी प्रभावी असणे गरजेचे आहे. नोकरी व्यवसायात अतिशय चांगले व लाभदायक वातावरण वरि÷ खूष राहतील. पदोन्नमी मिळण्याची शक्मयता.


सिंह

मानसिक स्थिती आनंदी व उत्साही राहील. त्यामुळे अत्यंत अवघड कामातदेखील सहज यश मिळवाल. अष्टम हर्षलमुळे अपघात, आजार, गैरसमज, शस्त्रक्रिया, शत्रुत्व यांची शक्मयता राहील. समुद्रस्नान अथवा समुद्राशी दंगामस्ती अंगलट येण्याची शक्मयता. कुणाच्याही खासगी जीवनात डोकावू नका. निष्कारण मनस्ताप होईल.


कन्या

चतुर्थातील शनिमुळे कोणतेही धाडस करताना 10 वेळा विचार करा. थट्टामस्करी अंगलट येवू शकते. काही अनिवार्य प्रसंग घडून झटपट विवाहाचे योग. आर्थिक दृष्टय़ा अति चांगले योग. प्रेमप्रकरणात फसगत. तसेच काही अघोरी प्रयोगांचीही शक्मयता राहील. सावध राहणे योग्य ठरेल.


तुळ

अति विचार व कामाचा अति ताण, आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरेल. एखादी न सुटणारी समस्या सुटेल. आर्थिक व्यवहारात मोठे यश. घरादारासंदर्भातील कामे होऊ लागतील. नोकरी व्यवसायाच्या बाबतीत नव्या संधी. रवी,मंगळ, केतुचा षडाष्टक योग, दुर्घटना, आजार, अपघात, वाढते खर्च व गैरसमज या दृष्टीने त्रासदायक.


वृश्चिक

रवि, मंगळाचा त्रिकोण योग काही बाबतीत अतिशय चांगली फळे देईल. काही अविस्मरणीय व भाग्यवर्धक अनुभव येऊ शकतील.  वैवाहिक जीवनात आनंदी  वातावरण राहील. मोठमोठे समारंभ, मेळावे, प्रवास व बेडका वगैरे ठिकाणी किमती वस्तू हरवण्याची शक्मयता. सर्व दृष्टीने जपावे लागेल. धनलाभ व महत्त्वाच्या व्यवहाराने सप्तहाची सुरुवात होईल.


धनु

गडबड व घाईत असताना अचानक पाहुणे मंडळी येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्मयता. खर्च वाढतील. नोकरी व्यवसायात नवीन जबाबदारी स्वीकारून काही जणांना खूष ठेवावे लागेल. त्यामुळे मनस्वास्थ्य ठीक रहणार नाही. सामाजिक प्रति÷ा व आरोग्याची काळजी घ्यावी.


मकर

कामाच्या घाईगडबडीत कोणतेही महत्त्वाचे काम करू नका. प्रवासात धोका अथवा वाहन बिघडणे असे अनुभव येतील. मुलाबाळांच्या बाबतीत काही इच्छा पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. गुप्त शत्रुच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. वैवाहिक जीवनात, किरकोळ मतभेदाला गंभीर वळण लागेल. सर्व तऱहेने सांभाळावे. ऐनवेळी झालेल्या घोटाळय़ांमुळे सरकारी कामे खोळंबतील.


कुंभ

प्रेमप्रकरणे व मोबाईलवरील संदेशापासून जपा. सरकारी कामे होऊ लागतील. राशिस्वामी रवि बलवान आहे न होणारी कामेसुद्धा होतील. काही व्यक्तींच्याकडून वास्तूसंदर्भात फसवणूक. त्यामुळे आर्थिक नुकसान. नको त्या व्यक्तीमुळे मनस्ताप. संततीविषय बाबींसाठी वेळ काढावा लागेल.


मीन

इतरांची जबाबदारी स्वीकारल्याने कामात विलंबाने यश. भागीदारी व्यवसायात निर्णायक प्रसंग. ऐनवेळी येणाऱया पाहुणे अथवा पत्रांमुळे महत्त्वाच्या कामासाठी स्वत:च धावपळ करावी लागेल.आर्थिक व्यवहारात चांगले यश. आरोग्याच्या तक्रारी, तसेच शत्रूपीडा यापासून जपावे. वैवाहिक जीवनात अपेक्षित शुभ घटना. खर्चाच्याबाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.