|Saturday, July 20, 2019
You are here: Home » उद्योग » जिओ फोन 2 च्या नोंदणीस प्रारंभ

जिओ फोन 2 च्या नोंदणीस प्रारंभ 

सध्याच्या ग्राहकांना केवळ 501 रुपयांत मिळणार फोन

वृत्तसंस्था/ मुंबई

रिलायन्सच्या जिओ फोन 2 ची नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. मायजिओ ऍप अथवा जिओच्या संकेतस्थळावर जात या फोनसाठी नोंदणी करता येईल. या फोनची किंमत 2,999 रुपये आहे. रिलायन्स इन्डस्ट्रीजने 5 जुलै रोजी 41 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिओ फोन 2 चे सादरीकरण केले होते.

जिओ फोन 2 साठी कंपनीने खास सुविधेची घोषणा केली आहे. यानुसार जिओचा जुना फोन देत जिओ फोन 2 खरेदीसाठी केवळ 501 रुपये द्यावे लागणार आहे. मात्र ही एक्स्चेंज 21 जुलैपासून सुरू झाली आहे. या नवीन फोनमध्ये डय़ुअल सिमची सुविधा, 2.4 इंच डिस्प्ले, 512 रॅम, 4 जीबी स्टोरेज, 2000 एमएएच बॅटरी, 2 मेगापिक्सल रिअर आणि व्हीजीए सेल्फी कॅमेरा, एफएम, ब्लुटुथ, जीपीएस, वायफाय, एनएफसी या सेवांसह फेसबुक, युटय़ुब आणि व्हॉट्सऍप यासारखी ऍप्स असणार आहेत.

जिओ गिगाफायबरची नोंदणी

रिलायन्स जिओच्या गिगाफायबर ब्रॉडबॅन्ड सेवेच्या नोंदणीसाठी आजपासून प्रारंभ होणार आहे. कमी किमतीत ही सेवा देण्यात येईल असे सांगण्यात येते, मात्र दरपत्रक जारी करण्यात आलेले नाही. फायबर-टू-द-होम सेवा देशातील 1,100 शहरांमध्ये सुरू करण्यात येईल. जिओचे उच्च क्षमतेची ब्रॉडबॅन्ड सेवा 7 नोव्हेंबरपासून देशातील 80 शहरांत सुरू करण्यात येईल. गेल्या काही महिन्यांपासून या सेवेची चाचणी सुरू आहे. मायजिओ ऍप आणि जिओच्या संकेतस्थळावर ही नोंदणी सुरू आहे. ज्या शहरात सर्वाधिक नोंदणी होईल, तेथे पहिल्यांदा ही सेवा सुरू करण्यात येईल.