|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्रीकर सरकार सर्व बाबतीत अपयशी सभातींनी तिरंगा फडकाविणे चुकीचे

पर्रीकर सरकार सर्व बाबतीत अपयशी सभातींनी तिरंगा फडकाविणे चुकीचे 

प्रतिनिधी/ पणजी

पर्रीकर सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरले असून सभापतींनी सरकारी समारंभात तिरंगा फडकावणे चुकीचे आहे. खाण प्रकरणी सरकारने अद्यापही तोडगा काढलेला नसल्याने त्यावर अवलंबून असणारी जनता निराश झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दक्षिण गोव्यातील काँग्रेस उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी स्पष्ट केले.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. सार्दिन यांनी सांगितले की, पणजी ते मडगाव या मार्गावरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली असून त्यावर कोणतीच उपाययोजना करण्यात येत नाही. सरकारचे आणि प्रामुख्याने वाहतूक खात्याचे या मार्गावर लक्षच नाही. लोकांना 3 ते 4 तास महामार्गावर अडकून पडावे लागते. याला सरकारच जबाबदार. सरकारने काहीतरी उपाय करून ती समस्या सोडवली पाहिजे. वाहतूक सुरळित करण्यासाठी जादा पोलिस त्या मार्गावर नेमावेत. ते शक्य नसेल तर लष्करी जवानांकडे तो मार्ग वाहतूक नियंत्रित करण्यासाठी देण्यात यावा, अशा सूचना श्री. सार्दिन यांनी केल्या.

विधानसभा, लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलेली सूचना मुर्खपणाची असल्याची प्रतिक्रिया सार्दिन यांनी प्रकट केली. आता ज्या राज्यात मागील एक-दोन वर्षांत विधानसभा निवडणुका झाल्या तेथे पुन्हा येणाऱया लोकसभेबरोबर पुन्हा निवडणूक घेणे अयोग्य, चुकीचे आहे. विधानसभा कार्यकाल 5 वर्षांचा असतो. तो आधीच संपवणे योग्य नव्हे. आता विधानसभा, लोकसभा कार्यकाळ एकाच वेळी संपत असल्यास एकत्रित निवणुका घेता येतील, परंतु ते शक्य होत नाही, असे मत सार्दिन यांनी मांडले.

खाणबंदीचा प्रस्न सोडवण्यास सरकार चाल-ढकल करीत असून अद्यापही तो प्रश्न तसाच आहे. सरकारला त्याचे कीच सोयरसुतक नसल्याचे त्यांनी नमूद केले.