|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » भारताचा महान कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

भारताचा महान कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन 

ऑनलाईन टीम मुंबई :

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे  निधन झालं आहेवयाच्या 77 व्या वर्षी  त्यांनी अखेरचा श्वास घेतलाजसलोक रुग्णालयात वाडेकर यांचे  निधन झाले त्यांच्या निधनानं क्रिकेट विश्वातील मोठा तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहेपरदेशी भूमीवर भारताला विजयाची सवय लावून देणारा कर्णधार अशी वाडेकर यांची ओळख होती.

 

अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतानं परदेशात पहिली कसोटी मालिका जिंकून दिली. 1971 मध्ये वाडेकरांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या बलाढ्य संघांचा त्यांच्याच मायदेशात पराभव केला. 1958 पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणाऱया वाडेकरांनी 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 1966ते 1974 या कालावधीत वाडेकर भारतीय संघाकडून खेळलेआंतरराष्ट्रीय स्तरावर ते एकूण 37 कसोटी सामने खेळलेयामध्ये त्यांनी एक शतक आणि चौदा अर्धशतकं झळकावली.

Related posts: