|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » केरळात पावसाचा कहर सुरूच ;एका दिवसात 25 जणांचा मृत्यू

केरळात पावसाचा कहर सुरूच ;एका दिवसात 25 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

केरळला पावसापासून अजून कोणताही दिलासा मिळालेला नाही. पूरस्थितीमुळे नऊ ऑगस्टपासून 67 जणांचा मृत्यू झाला आहे, तर यातील 25 मृत्यू आजच्या एकाच दिवसात झाले आहेत. तर दुसरीकडे कोचीन विमानतळात पाणी भरल्यामुळे सेवा रद्द करण्यात आली आहे.

 

केरळच्या 12 जिह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय सैन्याने मदतकार्याचा वेग वाढवला असून पुण्याहून इंजिनिअर टास्क फोर्सची विशेष टीम केरळला रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली. केंद्र सरकार केरळच्या जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे असून कुठल्याही मदतीसाठी तयार आहे, असा विश्वास मोदींनी दिला.

 

Related posts: