|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » पुणे शहरात नेफ्रोलॉजिस्ट परिषदेचे आयोजन

पुणे शहरात नेफ्रोलॉजिस्ट परिषदेचे आयोजन 

ऑनलाईन टीम / पुणे :

नेफ्रोलॉजी विभाग डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे यांच्या तर्फे दि. 18 व 19 ऑगस्ट रोजी ‘इंडियन अकॅडमी ऑफ नेफ्रॉलॉजी’ संघटनेची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेचे सचिव डॉ तुषार दिवे यांनी दिली. येथील पत्रकार भवनमध्ये गुरूवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी अध्यक्ष डॉ दिलीप कदम, परिषद प्रमुख अभय सदरे, डॉ अतुल सजगुरे उपस्थित होते.

या परिषदेचे उद्घाटन शनिवार दि. 18 रोजी सकाळी 10 वा. डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणेच्या सभागृहात रूग्णालयाच्या अधिष्ठातांच्या हस्ते करण्यात येणार आहे. भारतातील विविध शहरामधून राष्ट्रीय ख्यातीचे मूत्रपिंडविकार तज्ञांना या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण भारतातून 200 हून अधिन नेफ्रॉलॉजिस्ट सहभागी होणार आहेत. ही परिषद तीन सत्रात पार पडणार असुन, परिषदेच्या पहिल्या दिवशी क्रोनिक किडनी डिसीज, हिमोडालेसिस, अक्युट किडनी इन्जुरी, सायंकाळी संघटनेची सर्व साधारण सभा व परिषदेच्या दुसऱया दिवशी मुत्रपिंड प्रत्यारोपणाविषयी सविस्तर सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर परिषदेत विविध विषयांवर नाविन्यपूर्ण पध्दतीने विचारमंथन करण्यात येणार आहे. तसेच नेफ्रोलॉजिस्ट आपले संशोधन सादर करणार आहेत. मूत्रपिंड विकाराच्या उपचारासाठी उपलब्ध झालेली नवनवीन उपकरणे आणि औषधे यांची माहिती देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन देखिल करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.