|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » सेंद्रिय ‘हेल्दी हार्वेस्ट’ आऊटलेटचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

सेंद्रिय ‘हेल्दी हार्वेस्ट’ आऊटलेटचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन 

ऑनलाईन टीम / पुणे :

  • महाराष्ट्र ऑरगॅनिक व रेसीडय़ू फ्रि फार्मर्स असो.ची स्थापना, राज्यभरातून 4 हजार सेंद्रिय शेतकऱयांची उपस्थिती

 

    राज्यातील सेंदिय शेतकरी आणि शहरातील ग्राहकांमध्ये दुवा साधणारे सेंद्रीय आऊटलेट ‘हेल्दी हार्वेस्ट’चा शुभारंभ पुण्यातील मगरपट्टा येथे 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱया राज्यभरातील शेतकऱयांची महाऑरगॅनिक व रेसिडय़ू फ्री फार्मर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.

    हेल्दी हार्वेस्टच्या उद्घाटनानंतर येथीलच ऍम्पीथिएटरमध्ये दुपारी 3 वाजता सेंद्रिय शेतकरी ग्राहक मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्यभरातून 4 हजार सेंद्रिय शेतकरी बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती पुण्यात देण्यात आली. पीकांवर फवारण्यात येणारी रासायनिक खतांमुळे व औषधांमुळे आज विविध दुर्धर आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यातून सेंद्रिय व विषमुक्त शेतीची गरज दिसून आल्याने सेंद्रिय आऊटलेटची पुणे व इतर मोठय़ा शहरांतून साखळी उभी करून गुणवत्तापूर्ण विषमुक्त शेतीमाल ‘हेल्दि हार्वेस्ट’ या ब्रँडची निर्मिती करण्यात आली आहे. आऊटलेटसोबत मोबाईल व्हॅनद्वारेही सेंद्रिय शेतीमालाची उत्पादने विक्री परवडणाऱया दरात ग्राहकांना करण्यात येणार आहे.