|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » महाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात अव्वल

महाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात अव्वल 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा कायम ठेवू या

शेती, पाणी, गुंतवणूक, गफहनिर्माण अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल कामगिरी करत असताना राज्याने आपला पुरोगामी वारसा जोपासणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनी मंत्रालय येथे ध्वजारोहणप्रसंगी केले.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये आतापर्यंत 16 हजार गावे जलपरिपूर्ण करत आहोत. पुढील काळात 25 हजार गावे जलपरिपूर्ण करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. या लोकसहभागाच्या चळवळीने राज्यात एक अभूतपूर्व क्रांती केली आहे. विशेषत: पावसाच्या खंड असलेल्या कालावधीत पिकांना शाश्वत  सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने उत्पादकता वाढली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उत्पादकता वाढत असतानाच शेतकऱयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी पेंद्र सरकारने उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा या सूत्रानुसार विविध पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. तसेच, राज्य सरकारनेही मोठय़ा प्रमाणावर अन्नधान्याची खरेदी केली आहे. आपले राज्य औद्योगिक क्षेत्रात सातत्याने अग्ा्रsसर आहे. राज्यात जास्तीत जास्त उद्योग यावेत, अधिकाधिक परकीय गूंतवणूक यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्यवसाय सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) धोरण राबविण्यात येत असल्यामुळे गेल्या 2 वर्षात देशात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 42 ते 47 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. रोजगारनिर्मितीतही राज्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. संघटित क्षेत्रात 8 लाख इतका सर्वाधिक रोजगारही महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग अशा सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी सरकार अनेक योजना राबवित आहे. पेंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2022 पर्यंत सर्वांना घरे ही योजना शहरी तसेच ग्ा्रामीण भागात राबविण्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा आपण पुढे  नेत आहोत. राज्याचे पुरोगामित्व अबाधित ठेवण्यासाठी सर्व समाजघटकांनी प्रयत्नशील रहायचे आहे. जात, धर्म आदी कोणत्याही कारणाने भेदभाव होऊ दिला जाणार नाही. यासाठी सामाजिक सौहार्द टिकून राहणे गरजेचे आहे. सर्वांना सोबत घेऊन आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे, असेही ते म्हणाले.

Related posts: