|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पेंग्विन कक्षात नवीन भिडू

पेंग्विन कक्षात नवीन भिडू 

पेंग्विन कक्षात जल्लोष; पाहण्यासाठी मुंबईकरही आतूर

मुंबई / प्रतिनिधी

मुंबईतील राणी बागेचे खास आकर्षण असलेल्या पेंग्विन कक्षात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी रात्रीच्या सुमारास मादी पेंग्विनच्या अंडय़ातून 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एका गोंडस अशा पेंग्विनचा जन्म झाला. त्यामुळे पेंग्विन कक्षात जल्लोषाचे वातावरण आहे. आता सात पेंग्विनच्या कुटुंबात नवीन भिडू आल्याने त्याला पाहण्यासाठी मुंबईकरही आतूर झाले आहेत.

मुंबईतील राणी बागेत 26 जुलै 2016 रोजी कोरियावरून हंबोल्ट जातीचे 8 पेंग्विन आणण्यात आले होते. त्यामध्ये 3 नर आणि 5 मादी पेंग्विन होते. डोनाल्ड, डेझी, पपाय, डोरी, ऑलिव्ह, बबल, मोल्ट, फ्लिपर, अशी त्यांची नावे होती. त्यांना खास बनविण्यात आलेल्या शीत वातावरणातील कक्षात ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका मादी पेंग्विन डोरी हीचा 18 ऑक्टोबर 2016 रोजी जंतूसंसर्ग होऊन दुर्दैवी मफत्यू झाला होता. या घटनेचे त्यावेळी तीव्ा्र पडसाद पालिकेत उमटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे पेंग्विन राणी बागेत आणण्यात आले होते. त्यामुळे साहजिकच पहारेकरी आणि विरोधकांनी त्या पेंग्विनच्या मफत्यूवरून सेनेला टार्गेट केले होते. थंड प्रदेशात राहणाऱया पेंग्विनसाठी दमट हवामान, वातावरण असलेल्या मुंबई शहरात हे पेंग्विन जगणार नाहीत, अशी भविष्यवाणीही विरोधकांनी केली होती. मात्र, आता या पेंग्विनना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्या एका पेंग्विनच्या मफत्यूनंतर आतापर्यंत दुसरी कोणतीही दु:खद घटना घडली नाही. उलट एका लहान पेंग्विनचा देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी जन्म झाला ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी घटना आहे. पेंग्विन हा मूळ भारतातील नसून कोरियातील आहेत. मात्र, भारतात एका पेंग्विनचा जन्म झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या पेंग्विनचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

स्वातंत्र्यदिनी जन्म

या सात पेंग्विनमध्ये सर्वांत कमी वयाचा असलेला मोल्ट (तीन वर्षे) आणि त्याची जोडीदार फ्लिपर (साडेचार वर्षे) यांची जोडी जमली आणि काही दिवसांतच गरोदर फ्लिपरने 5 जुलै 2018 रोजी एक अंडे दिले होते. त्यामुळे या अंडय़ातून एक पेंग्विन जन्माला येणार, हे जवळजवळ निश्चितच होते. अंडय़ातून पेंग्विनचे पिल्लू 40 ते 45 दिवसात जन्माला येते. बुधवारी या अंडय़ाला 40 दिवस पूर्ण झाले आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी हे अंडे फुटून बेबी पेंग्विन जन्माला आले.

मुंबईकरांना मात्र प्रतीक्षाच

आता या लहान पेंग्विनची दोन ते तीन महिने विशेष काळजी घेण्यात येणार आहे. त्याला त्या वातावरणात राहता येईल यासाठी तज्ञाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तोपर्यंत मुंबईकरांना या लहान भिडूला बघायला काही कालावधी प्रतीक्षा करावी लागणार आहे.