|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » देशाने दूरदृष्टीचा नेता गमावला : पर्रीकर

देशाने दूरदृष्टीचा नेता गमावला : पर्रीकर 

प्रतिनिधी /पणजी :

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दु:ख प्रकट केले असून देशाने एक दूरदृष्टीचा नेता गमावल्याचे अमेरिकेतून पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

वाजपेयी हे भाजपचे पहिले पंतप्रधान होते व ते तीनवेळा पंतप्रधान झाले. त्यांनी देशाला एका उंचीवर नेऊन पोहोचवले. त्यांच्या सडेतोड व भावनाप्रधान भाषणांनी ते जनतेच्या लक्षात राहिले व यानंतरही राहतील. ते उत्कृष्ट संसदपटू, कवी तसेच उत्तम प्रशासक होते. त्यांचे पंतप्रधानपदाचे कार्य तसेच भाषणे नेहमीच लक्षवेधी ठरली होती. त्यांचे निधन धक्कादायक असून कार्य नेहमीच स्मरणात राहिल, अशा शब्दात पर्रीकर यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली आहे.