|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजला मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच

गडहिंग्लजला मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच 

प्रतिनिधी /गडहिंग्लज :

मराठा आरक्षण व अन्य मागणीसाठी सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने राज्यभरात सुरू असलेल्या ठोक मोर्चा, बंद, ठिय्या आंदोलन सुरू आहेत. याचपार्श्वभुमीवर गडहिंग्लजला दसरा चौकातील शिवाजी पुतळयासमोर8 ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. गुरूवारी आंदोलनाचा नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले असून दिवसभरात विविध राजकीय पक्ष, हसुरचंपू, सरोळी ग्रामस्थ, शिवसेना व बेरड समाजाच्या पदाधिकारी येवून आंदोलनास पाठिंबा दिला.

गुरूवारी दिसभर ठिय्या आंदोलन ठिकाणी प्रसिध्द शाहीराचे पोवाडे वाजवून शासनाचे लक्ष वेधले. बुधवारी रात्री हरळी ग्रामस्थांच्यावतीने भजन आंदोलन करून ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. तर गुरूवारी रात्री इंचनाळ ग्रामस्थांच्या वतीने भजन आंदोलन करणार आहेत. तत्पूर्वी ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देत दिवसभर दसरा चौकात गर्दी होत होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हा उपप्रमुख प्रशांत खांडेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, दिलीपराव माने, उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, बाळेश नाईक, मारूती मोरे, संभाजी इंजल, राजू पोतनीस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हसुरपंचू व सरोळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रापंचायत सदस्य, महिला व ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राजू खणगावे व विजय मोहिते यांनी आंदोलकांना झुणका-भाकरची सोय केली होती. ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी सकल मराठा ठोक मोर्चा समितीचे समन्यवक किरण कदम, नागेश चौगुले, किरण डोमणे, प्रा. शिवाजीराव भुकेले, विनायक पोवार, अभिजित पोवार, सुदर्शन पोवार उपस्थित होते.