|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादई निवाडा म्हणजे गोव्याचा विजय नव्हे

म्हादई निवाडा म्हणजे गोव्याचा विजय नव्हे 

प्रतिनिधी /पणजी :

म्हादई जलतंटा लवादाचा निकाल म्हणजे गोव्याचा विजय नसून म्हादई प्रश्नावर सरकार राज्याचे जनतेचे हितरक्षण करण्यास अपयशी ठरल्याची टीका काँग्रेस पक्षाने केली आहे. सरकारने तो निकाल स्वीकारु नये तसेच त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. निकालपत्रातून गोवा सरकारवर ओढण्यात आलेले ताशेरे आणि ठेवण्यात आलेला ठपका गंभीर असून सरकारने त्याची दखल घेऊन तातडीने कृती करावी, असे काँग्रेसने नमूद केले आहे.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे आणि प्रवक्ते यतीश नाईक यांनी सांगितले की म्हादईचा एक थेंबही वळवू देणार नी अशी भाषा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर-जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी केली होती. आता तर 13.4 टिएमसी पाणी वळवण्याची अनुमती लवादाने कर्नाटक सरकारला दिली आहे. अशी परिस्थिती वस्तूस्थिती असताना सरकारमधील मंत्री कोणत्या तोंडाने हा गोव्याचा विजय आहे? असे म्हणतात असा सवाल करुन सोपटे- श्री नाईक यांनी आश्चर्य प्रकट केले आहे.

14 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वजता हा निकाल लवादाने जाहीर केला. त्या निकालाची पाने 2711 एवढी नसताना त्याचे वाचन मुख्यमंत्री व इतर मंत्र्यंनी केव्हा केले? असा प्रश्न पडतो कारण अर्ध्या तासात त्यांनी ‘विजय’ म्हणून व्टिट केले हे एक आश्चर्य असल्याचे सोपटे व नाईक म्हणाले.

म्हादईचे पाणी वळवल्यास शेती, जलसिंचन, पिण्याची पाणी, पर्यावरण, हवामान यावर त्याचे काय परिणाम होतील हे लवादासमोर मांडण्यास सरकार कमी पडले आणि पूर्णपणे अपयशी ठरले. आमची बाजू भक्कम आहे. एवढेच हे मंत्री  जनतेला सांगत राहिले प्रत्यक्षात सरकारची बाजू भक्कम नव्हती हे आता उघड झाले असून बाजू बळकट होण्यासाठी लवादासमोर पुरेशी माहिती देण्यात आली नाही हे देखील समोर आले आहे. त्या निकालाचे परिणाम भविष्यात गोव्याला भोगावे लागतील असा इशारा देवून लवादासमोर कमकुवत ठरल्याबद्दल त्यांनी गोवा सरकारचा निषेध केला.