|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » Top News » पुण्यातील आयटी इंजिनिअरांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

पुण्यातील आयटी इंजिनिअरांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या 

ऑनलाईन टीम / पुणे :

आयटी हब म्हणून मान्यता मिळाल्यामुळे देशभरातून आयटी प्रोफेशनल्सचा पुण्याकडे ओढा असतो. मात्र पुण्यातील आयटी कर्मचाऱयांच्या नोकऱयांवर गदा आली आहे. या कर्मचाऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनला सुरुवात केली आहे.

मागील दीड-दोन वर्षांपासून या आयटी कंपन्या त्यांच्याकडे वर्षानुवर्षे काम करणाऱया इंजिनिअरना या ना त्या कारणाने कामावरून काढत आहेत. अनुभवी इंजिनियरना कामावरुन काढून नव्या तरुणांना कमी पगारात कामावर ठेवून नफा कमावण्याचा या कंपन्यांचा उद्देश आहे. मात्र यामुळे हजारो आयटी इंजिनिअर बेरोजगार बनत आहेत. त्यामुळे कोणा आयटी इंजिनिअरवर ड्रायव्हर म्हणून कॅब चालवण्याची वेळ आली आहे तर कोणी बेकरी उघडली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी या तरुणांनी एक फोरमही स्थापन केला आहे. मात्र सरकार दरबारी प्रतिसाद मिळत नसल्याने हे तरुण आजपासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

Related posts: