|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नविन वस्त्राद्योग धोरणाची तातडीने अंमलबजावणी करा’

नविन वस्त्राद्योग धोरणाची तातडीने अंमलबजावणी करा’ 

विटा यंत्रमाग संघाची वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी/ विटा

जुलै 2016 मध्ये इचलकरंजीतील वस्त्राsद्योग परीषदेत दिलेले 5 टक्के व्याज अनुदान आणि वीज दरात 1 रूपयेच्या सवलतीच्या अश्वासनाची आता दोन वर्षानंतर पुर्तता करावी. 2018 च्या नविन वस्त्रsाद्योग धोरणाची अंमलबजावणी अद्यापही सुरू झाली नाही. नविन वस्त्रsाद्योग धोरणाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी विटा यंत्रमाग संघाच्यावतीने मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती किरण तारळेकर यांनी दिली.

महाराष्ट्राचे वस्त्रsाद्योग मंत्री सुभाष देशमुख आणि खासदार संजय पाटील यांनी विटा यंत्रमाग संघास सदिच्छा भेट दिली. यावेळी अध्यक्ष किरण तारळेकर यांनी विटा यंत्रमाग संघाच्यावतीने वस्त्राsद्योग मंत्र्यांना राज्यातील वस्त्राsद्योगाच्या विविध अडचणीचीं माहीती देत मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अमरसिंह देशमुख, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, अशोक गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याबाबत तारळेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, नविन वस्त्रsाद्योग धोरणाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. जुलै 2016 मधील आश्वासनाची पुर्तता झालेली नाही. या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. वस्त्राsद्योगीतील कच्चा माल असणाऱया कापसाचा वायदेबाजारात समावेश झाला आहे. यामुळे वस्त्राsद्योगास तेजी-मंदीच्या अनिश्चिततेला सामोरे जावे लागते. शेतकरी आणि वस्त्राsद्योग साखळीतील सर्व घटकांना कापसाच्या कृत्रीम तेजीöमंदीचा खुप मोठा फटका बसत आहे. काही बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बडे कापुस व्यापारी याचा मोठय़ा प्रमाणावर गैरफायदा घेत आहेत. ही बाब लक्षात घेऊन कापसाचा वायदे बाजारातील समावेश काढून टाकावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

राज्य शासनाने 2016 पासून वीज दर सवलतीबाबत घेतलेले प्रादेशीक भेदभावाचे धोरण रद्द करावे. विदर्भ, मराठवाडय़ाप्रमाणे वीज दर सवलती सर्व राज्यभरातील वस्त्राsद्योगास लागु कराव्यात. वस्त्राsद्योग घटकांचे गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेले व्याज अनुदान तातडीने वितरीत करावे, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मंत्री देशमुख यांनी या मागण्यांबाबत शासन सकारात्मक विचार करेल आणि लवकरच वस्त्राsगाच्या सहकार्यासाठी आवश्यक ते निर्णय घेऊ अशी खात्री दिल्याचे तारळेकर यांनी म्हंटले आहे.

स्वागत आणि प्रास्तावीक किरण तारळेकर यांनी केले. दत्तात्रय चोथे, सुरेश म्हेत्रे, विनोद तावरे, अनिल चोथे, नितीन तारळेकर यांच्यासह यंत्रमागधारक, शहर आणि परीसरातील यंत्रमाग व्यवसायिक उपस्थित होते.