|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान 

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून आज शपथ घेतली. भारतीय वेळेनुसार सकाळी पावणेअकरा वाजता इस्लामाबादमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी इम्रान खान यांनी शपथ दिली.

इम्रान खान यांच्या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू, लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी इम्रान यांची तिसरी पत्नी बुशरा ही देखील उपस्थित होती. बुरख्यामध्ये आलेल्या बुशरा या सतत माळ जपताना दिसत होत्या. पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान यांच्या पीटीआयला सर्वाधिक बहुमत मिळाले होते. पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांनी काल इम्रान खान यांना पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकल्याचे जाहीर केले. त्यांच्याविरोधात माजी पंतप्रधान व सध्या तुरुंगात असलेले नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ उभे राहिले होते. मात्र, इम्रान यांना 176 मते पडली. यामुळे विरोधकांनी अध्यक्षांचा हा निर्णय मंजून नसल्याचा घोषणा दिल्या. पाकिस्तान पिपल्स पार्टी हा संसदेमध्ये तिसरा मोठा पक्ष आहे. मात्र, त्यांनी शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी समर्थन देण्यास नकार दिला. तसेच मतदानावर बहिष्कार टाकला. इम्रान खान यांनी प्रचारावेळी शरीफ यांच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला होता. तसेच निवडून आल्यानंतरच्या भाषणात त्यांनी देशामध्ये वेगाने विकास आणण्याचे सांगितले होते. तसेच देशाबाहेर गेलेल्या संपत्तीला परत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.