|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » खेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट

खेडकर शाळेवर कारवाई करू नये : कोर्ट 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

डॉ. वाय. एस. खेडकर इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा येईल, अशी कुठलीही दंडात्मक वा इतर कारवाई करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालायच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना बी. वराळे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी दिले. 

 संदीप कानडे यांच्यासह 58 पालकांनी शाळेच्या शुल्कवाढी विरोधात याचिका केली आहे. पालकांनी संस्था, शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांकडे शुल्कवाढ, क्रमिक पुस्तके, वह्या, शालेय गणवेश व कॅन्टीनमधील जेवण सक्ती विरोधात तक्रार दिली होती. शैक्षणिक अर्हताधारक शिक्षकाची नेमणूक न करणे, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 व महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनियम अधिनियम 2011 मधील नियम 12 नुसार याविरोधात कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही व प्रशासनाकडून दिलासा मिळाला नाही. त्यामुळे पालक खंडपीठात आले आहेत.याचिकाकर्त्यां®ााr बाजू गजानन क्षीरसागर यांनी मांडली. त्यांना अमोल मुळे व अविनाश औटे यांनी सहकार्य केले. शाळेने आवाजवी शुल्कवाढ मागे घ्यावी व 7 ऑगस्ट रोजी दिलेल्या नोटीसनुसार कार्यवाहीला स्थगिती द्यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती.